माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या सामाजिक संघटनेच्या उपक्रम.
चंद्रपूर – दिनांक 25 ऑगस्ट रोजी माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी तुळशीराम जांभुळकर – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संघटनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक पी. पी.शेवाळे व पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना सामूहिक राखी बांधून कार्यक्रम साजरा करण्यात. ह्यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. हाच उद्देश मनात ठेवून विदर्भ महिला अध्यक्ष शिल्पाताई बनपूरकर यांच्या उपस्थितीत तसेच , विदर्भ महिला सहसंघटक कीर्ती पांडे, विदर्भ महिला संपर्क प्रमुख संगीता कार्लेकर,चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रीती साव,चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख नीता नागोसे तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख करण कोलगुरी विदर्भ महिला कार्यकारी व चंद्रपूर जिल्हा महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांनी मोठ्या उत्सवाने रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सहभाग दिला होता. रक्षाबंधन कार्यक्रम हा रामनगर पोलीस स्टेशन येथे पार पडला. पोलीस स्टेशन मध्ये सर्व कर्मचारी बंधूना सर्वांच्या उपस्थित राखी बांधून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शिल्पाताई बनपूरकर म्हणाल्या, रक्षाबंधन हे भाऊं -बहिनींच्या आपुलकीच्या प्रेमळ भावोत्कट नात्यातील अखंड प्रेमाचं आणि अतूट विश्वासाचे प्रतीक आहे.त्याचप्रमाणे प्राणप्रिय अशा मातृभूमी रक्षणासाठी सदैव सतत सृजन तसेच कर्तव्य बजावणीची सातत्याने जाणीव करून देणारे पवित्र रक्षाबंधन आहे. आमचे बंधू सतत आमचे रक्षण करत असतात.त्यामुळे मी त्यांना रक्षाबंधनाचा सण उणीव भासू नये म्हणून हे कार्यक्रम वरिष्ठांच्या आदेशाने राबवित आहे. आमची संघटनाही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.


