सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यामधील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे भावी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामे करावी लागत असल्याने, खातेदारांच्या रोषाचा सामना करावा लागत असताना. जानेफळ येथील शाखा व्यवस्थापकाच्या सुयोग्य नियोजनाने ४० खेड्यांमधील खातेदार अनेक अडचणी पासून मुक्त झाल्याने घेता आहे गर्दीपासून मोकळा श्वास. प्रत्येक शाखा व्यवस्थापक यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते परंतु आरटीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कामे करीत असतात यामध्ये प्रत्येक शाखा व्यवस्थापकाची कामे करण्याची हातोटी आलग असते. जानेफळ शाखेमध्ये नुकतेच रुजू झालेले शाखा व्यवस्थापक राहुल घागरे अपुऱ्या पाच कर्मचाऱ्याच्या भरोशावर चाळीस खेड्यांमधील 20000 खातेदारांचा व्यवहार करत असताना खातेदाराच्या अनेक समस्यांना व दोषांना सामोरे जावे लागत असताना कर्मचार्याचा व्यवहारिक ताण कमी करण्यासाठी, व खातेदारांना कमी वेळामध्ये योग्य न्याय देण्यासाठी, जानेफळ शाखा अंतर्गत भारतीय स्टेट बँक शाखेचे 16 ग्राहक सेवा केंद्र असून या बँक मित्रा बोलावून, 75 व्या स्वातंत्र्य दिनानंतर 16 ऑगस्ट रोजी पासून, प्रत्येक दिवशी दोन बँक मित्रांना जानेफळ शाखेमध्ये कामकाज करण्यासाठी व्यवस्था करून दिली. प्रत्येक खातेदाराला २०,००० रुपयापर्यंत पैसे भरण्याचा , १०,००० रुपये जमा करण्याचा व २५,००० रुपये ग्राहक केंद्राद्वारे इतर खात्यात पाठविण्याचा व्यवहार करण्यासाठी सेवा देत असल्याने ,दि.१६ ऑगस्ट रोजी देऊळगाव साखरशा येथील ग्राहक सेवा केंद्राचे संचालक गोपाल लक्ष्मण बुंदे वरवंड येथील ग्राहक सेवा केंद्राचे संचालक श्रीकृष्ण माडोकार यांनी सेवा दिली. या सोळा ग्राहक सेवा संचालकाच्या कामकाजामुळे बँकेमधील कर्मचाऱ्याचा कामाचा बोजा कमी होऊन शाखेमधील गळतीचे प्रमाण कमी झाले शाखेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना गर्दी अभावी मोकळा श्वास घ्यावे लागत असल्याने ग्राहक खुश होऊन शाखा व्यवस्थापक यांचे आभार मानत आहेत.मेहकर तालुक्यांमध्ये ग्राहक सेवा केंद्र संचालक व्यवहार करणाऱ्या खातेदाराची लुबाडणूक करत असून याबाबत अनेक शाखा व्यवस्थापकांना रिझर्व बँकेच्या अधिकार्यांना तक्रारी प्राप्त झाले असून रिझर्व बँकेचे व शाखा व्यवस्थापक यांचे ग्राहक सेवा केंद्रावर करडी नजर आहे रिझर्व बँकेच्या धोरणानुसार प्रत्येक बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रा मधुन व्यवहार करणाऱ्या खातेदारांना विनामूल्य व्यवहार करण्याचे आदेश असताना काही ग्राहक सेवा केंद्र संचालक पैसे काढणे, जमा करणे व पाठविणे यासाठी दहा रुपयांपासून ते शंभर रु. अवैधरित्या वसुली करत असल्याचा प्रकार समोर येत असल्याने. सर्व भारतीय स्टेट बँक शाखेच्या खातेदारांनी विनामूल्य व्यवहार करावा असे रिझर्व बँकेने आदेश पारित केले आहे. अवैधरित्या पैसे वसूल करणाऱ्या ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांची तक्रार विक्री केल्यास त्याचे सीएससी सेंटर बंद होईल.