किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : कोरोना काळामध्ये संपूर्ण तालुक्यात कोरणाचे रुग्ण वाढत असतांना कोसगाव येथील ग्रामपंचायत चे तरुण तडफदार सरपंच अजय राव व येथील ग्रामसेवक अधिकारी यांच्या नियोजन बद्दल कामातून येथील नागरिकांमध्ये कोरोना विषयी योग्य ती माहिती देऊन जनजागृती करून संसर्गजन्य कोरोना आजाराला कोसगाव पासून दूर ठेवण्यात यांना यश आले आहे यासाठी म्हणून पातुर तालुका विकास मंच यांच्या वतीने कोळगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच अजय राव यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्प हार गुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमार सिंह बायस, गणेश गाडगे, रितेश सौंदळे ,पांडुरंग सातव, किरण कुमार निमकंडे, योगेश फुलारी, रुपेश फलके व इतर मान्यवर उपस्थित होते.