विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/- चिमुर तालुक्यातील नेरी येशील सरस्वती कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविण्याची परंपरा कायम ठेवीत याही वर्षी 37 विद्यार्थी पैकी 22 विद्यार्थी उत्तीर्ण होत यशाची उज्ज्वल परंपरा मागील 10 वर्षा पासून कायम ठेवली आहे .महाराष्ट्र राज्य विद्या परिषद पुणे मार्फत ही परिक्षा दि 6एप्रील 2021 रोजी घेण्यात आली होती. या परिक्षेत विद्यालयाचे 37 विद्यार्थी बसले होते. त्यातील 22 विदयार्थी हे या परिक्षेत उत्तीर्ण झालेत. त्यासोबतच जिल्ल्यात मागील 10 वर्षापासून सर्वाधीक विद्यार्थी पास होण्याची अखंड मालिका सरस्वती कन्या विद्यालयाने कायम राखल्याचे दिसून येत आहे. नुकतेच या सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने शाळेत पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन सत्कार करण्यात आला. या परीक्षेत प्राविन्यप्राप्त होतकरू विद्यार्थ्याना पुढिल शिक्षणाची सोय व्हावी याकरिता केंद्र शासन व राज्य शासन मिळून 48 हजार रु ची शिष्यवृत्ती प्रधान करतात . त्यामुळे विदयार्थ्याच्या पुढील शिक्षणाकरिता आर्थीक मदतीची सोय होते या परिक्षेत कन्या विद्यालयाचे प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आदित्य राजु पाटिल ऋषिकेश सोनवाने आदित्य चिमुरकर भविष्या श्रीरामे श्रेयस पिसे तेजस्विनी मेश्राम प्रतीक्षा निकुरे रंजना मुंगले श्रेया पिसे साक्षी मेश्राम वैभव गोहणें शर्वरी फुलझेले सानिया पिसे आदर्श तामगाडगे अभिलाष चौधरी संनथ डांगे पायल सोनवाने समीर जगताप साहिल कुंभरे पीयूष मेश्राम कशीस डांगे या सर्व विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करीत यश संपादन केले या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका अटाळकर मॅडम तसेच शिक्षक शेंडे सर ढोले सर पिसे सर हरने सर नागदेवते मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद आईवडील याना दिले
अवघड असणाऱ्या या परीक्षेत सातत्याने जिल्ह्यात प्रथम स्थानी राहणे ही आमच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे
संस्था प्रमुख – संजय भाऊ डोंगरे नेरी
सरस्वती कन्या विद्यलयाच्या माध्यमातून आमच्या पाल्यानी यश संपादन केले हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे
यश प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक


