समाजमनाशी एकरूप विदुषी
मुंबई, दि. २५ :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतातील सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविधांगी क्षेत्रात डॉ. आम्वेट यांनी संशोधक, अभ्यासक म्हणून तसेच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी सक्रिय असे योगदान दिले आहे. समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या या योगदानाची नोंद राहील. डॉ. गेल ऑम्वेट यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असे मुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


