सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
पंचायत समिती मेहकर अंतर्गत येत असलेल्या अंजनी बु येथील बऱ्याच वर्षाचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी प्रकरण गेले आहे आयुक्तांकडे. पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी चांगलेच आले अडचणीत,आता मोठं मोठे मासे लागणार गळाला म्हणून पंचायत समिती व जि.परिषद चे संबंधित अधिकारी पुढील कार्यवाहीस करत आहेत टाळाटाळ आणि जनतेला दिल्या आजवर भूलथापा आणि अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे न्यायव्यवस्था भंग पावत चालली आहे त्यामुळे जनतेच्या विश्वासाला बसत आहे तडा.अधिकारी घेत आहेत पदाचा व अधिकाराचा गैरफायदा.प्रशासनामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी दिसून येत नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणतेच राहिले नाही कायद्याचे भंय
आणि जनतेची दिशाभूल करणारे अधिकारीच बसलेले आहेत खुर्च्यांवर
आणि गुन्हेगार व्यक्ती मुख्यकार्यवाही पासून वंचित तर जनता घेत आहे हेलपाटे म्हणून कंटाळून
या अंजनी बु च्या
गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायत मध्ये बोगस नमुना 8 ,घर कर,पाणीपट्टी कर पावत्या तसेच बोगस घरकुल व शैचालय याची चौकशी करून कार्यवाही करणे करिता ग्रामस्थांनी अनेक वेळा उपोषण व आत्मदहनासारखी आंदोलन केली होती परंतु जाणीवपूर्वक झोपेचे सोंंग घेणारे व गेंड्याची कातडी व कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांवर काही एक फरक पडलेला दिसून आला नाही.म्हणून या कुंभकर्णी झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात दि.26 /8/2021 ला या कुंभकर्णी झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी व थाली व घंटा बजाव आंदोलन
करण्यात येईल.यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडला किंवा सामाजिक शांतता भंग पावली तसेच जिवीत हानी झाल्यास मृत्यूचे कारण यास स्वतः आपण व संबंधित अधिकारी व पदाधिकारी तसेच कर्मचारी जबाबदार असाल याची गांभीर्याने दक्षता घेणे व अर्जाचे गांभिर्य घेऊन तक्रार निकाली काडण्यास यावे या साठी दिले निवेदन.यांमध्ये उषाबाई त्र्यंबक नागोलकर
समाधान जानकीराम पदमने
अमोल जनार्धन शेवाळे
रामभाऊ नामदेव राऊत
विष्णू शेषराव ढोले
गजानन नारायण नागोलकर
कविता त्र्यंबक नागोलकर
शंकर नामदेव पायघन
दिलीप प्रभाकर आल्हाट
अशोक दत्तात्रय नागोलकर
ओम बळीराम ढोले
विशाल लाड व इतरही अनेक ग्रामस्थांनी सह्या केलेल्या आहेत.