पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागावी
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी:- केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी जनआशीर्वाद यात्रे दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने शिवसेनेचे भावना भडकले असून केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांचे जनआशीर्वाद यात्रा नव्हे तर जनभावना भडकविण्याचे यात्रा असल्याचे टीका व तीव्र शब्दात निषेध करून शिवसेनेचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची तात्काळ जाहीर माफी मागावी अशी एकमुखी मागणी करून ‘याद राखा’ यापुढे असले प्रकार शिवसेनेकडून खपवून घेणार नसल्याचा ईशारा प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे.
पुढे रियाज शेख यांनी, केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे हे सुद्धा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होते त्यातल्या त्यात तेही शिवसेना पक्षाचे. पक्ष बद्दलल्या बरोबर संस्कृती व संस्कार बद्दलत नाही परंतु ना.नारायण राणे अल्पावधीतच सारे काही विसरून पिसाळल्यासारखे बोलत आहेत. केंद्रीय मंत्री पदाचा ना.नारायण राणे यांना माज आला असेल तर शिवसैनिक माज उतरवायलाही मागे-पुढे पाहत नाही असा सोज्वळ इशाराही रियाज शेख यांनी पत्रकातून दिला आहे.


