जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर/ दि 25 ऑगस्ट 2021
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशातील 44 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे यामध्ये मराठवाड्यातून उमेश रघुनाथ खोसे यांना हा
राष्ट्रीयस्तरावरील आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. महामहीम राष्ट्रपतीच्या हस्ते त्याचे लवकरच वितरण होणार आहे. त्या संबंधी त्यांचा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी स्टाफ सेक्रेटरी कॅप्टन डॅा.बाळासाहेब गोडबोले, डॅा.श्रीकांत गायकवाड, अमोल पेठे, प्रा.काशिनाथ पवार, डॅा.संजय गवई, डॅा.रत्नाकर बेडगे व डॅा.विजयकुमार सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उमेश खोसे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे यासाठी बंजारा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकता यावे आणि मनोरंजक पद्धतीने अध्ययन करावे यासाठी 51 विविध प्रकारच्या ऑफलाईन ॲप्सची निर्मिती करून तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोलीभाषेतून पहिलीचे पुस्तक अनुवादीत करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोली भाषा आणि तंत्रज्ञान या उपक्रमाची राज्यस्तरावरील शिक्षणवारी या उपक्रमात निवड झाली होती.
यावेळी प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, मराठवाड्यातील एका उपक्रमशील शिक्षकाला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होणे आणि आमच्या महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार होणे ही एक आनंददायी बाब आहे.
या कार्यक्रमासाठी संजय गिरी, अशोक शिंदे व राम पाटील यांनी सहकार्य केले.