भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निषेधार्थ केल्या घोषणा
महाराष्ट्रात अराजकता सुरू असल्याचा आरोप
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने केलेली अटक ही निषेधार्ह असून भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा जाहीर निषेध करीत महाराष्ट्रात अराजकता निर्माण झाल्याचा आरोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केला.
भारतीय जनता पार्टी तालुका गडचिरोली व शहराच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील परिसरात उद्धव ठाकरे सरकारचा निदर्शने करून निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये जिल्हा महामंत्री गोविंदची सारडा, प्रशांतजी वाघरे, प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, नगराध्यक्ष सौ योगिता पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ योगिता भांडेकर , नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, धानोरा तालुका प्रभारी अनिलभाऊ पोहनकर, पंचायत समिती उपसभापती विलासजी दशमुखे, तालुका अध्यक्ष रामरतन गोहने, महामंत्री हेमंतजी बोरकुटे, तालुका संपर्क प्रमुख विलासची भांडेकर, अविनाश महाजन, लोमेश कोलते, महिला आघाडी तालुका अध्यक्ष दुर्गा काटवे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश निकोडे, राजू शेरकी, सागर कुंभरे हर्षल गेडाम, सुरेशजी मांडवगडे, यांच्यासह प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर झालेल्या टीकेबद्दल समर्थनार्थ नाही. परंतु हेच महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेते भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नेहमीच खालच्या पातळीवर टीका करीत आली आहे. आपण स्वतः खालच्या पातळीवर टीका करायची व दुसऱ्यांने केली तर ती सहन न करता त्यांच्यावर द्वेषपूर्ण भावनेतून कारवाई करायची असे प्रकार या महाराष्ट्रातील सरकार सातत्याने करीत आहे. यापूर्वीही एका सैनिक अधिकाऱ्याला व पत्रकाराला केवळ उद्धव ठाकरेंवर टीका केली म्हणून मारहाण करून अटक केलेली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील अनेक लोकांवर हे सरकार अकारण गुन्हे दाखल करीत आहे. इतरांवर टीका करायची मात्र स्वतःवर केल्यास त्याच्यावर द्वेषपूर्ण भावनेतून कारवाई करायची अशी दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील राज्य सरकार घेत आहे. या सरकारचा भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा विधानसभा क्षेत्राच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून महाराष्ट्रातील जनता ही अराजकता लवकरच संपवेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.











