किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : दिनांक २४-०८-२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबद्द्ल पातूर येथील संभाजी चौकात तीव्र निषेध करत आंदोलन करण्यात आले ,संपूर्ण महाराष्ट्रात हत्या आणि बलात्कार असे भयंकर गुन्हे असणाऱ्या आरोपींना राज्य सरकार अटक करत नाही, मात्र एका वाक्यावरून केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक केवळ राजकीय सूडापोटीच होत आहे. भाजपचा महाराष्ट्रातील वाढता जनाधार रोखण्याचा हा प्रयत्न आहे,असे भाजपाच्या वतीने घोषणा देत आरोप करण्यात आले यावेळी भाजपचे रमण जैन ,अनंत बगाडे ,चंद्रकांत अंधारे ,श्रीकांत बराटे ,अभिजीत गहिलोत ,मंगेश केकन ,कपिल खरप ,विनेश चव्हाण ,विश्वासराव देशमुख ,सचिन बारोकार ,सचिन बायस ,गणेश गाडगे ,राजेश आवटे ,किरण निमकंडे ,संजय उजाडे ,सागर आखरे ,गजानन गुजर ,शशिकांत भरकर ,विजय भगत ,विष्णु शेलारकर ,दिनेश करपे ,निलेश फुलारी ,भारत फुलारी ,दिनेश तायडे ,संजय गोतरकर ,अनिल खाडे ,शिरु (श्रीकृष्ण) पाटील ,निरज कुटे ,विट्ठल ताले ,अर्जुन लसनकर ,आशुतोष सपकाळ,सतीश ईंगळे ,किरण फुलारी ,अमोल राठोड ,मनोहर वगरे ,गोपाल ठाकरे ,हरिभाऊ चोपळे ,शिवदास राठोड ,गोपाल गोतरकर ,पुरुषोत्तम गिरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.