गोकुळ हिंगणकर
तेल्हारा तालुका तेल्हारा
तेल्हारा : गेल्या आठ दिवसांपासून तेल्हारा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कामे थांबली होती पेरणीनंतर सध्या पिक फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत आहे बळीराजा पिकाच्या संगोपनासाठी व्यस्त होतो यामध्ये शेतकरी निंदन, खुरपणी, डवरणी, फवारणी ,करण्यात व्यस्त होतो परंतु सततच्या पावसाने या कामावर विरजण पडते होतो आणि किडीचा प्रादुर्भाव सुध्दा मोठ्या प्रमाणावर झाला आहे.पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने शेतीच्या कामाला सुरुवात केली तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात केला आहे आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे पिकांची झपाट्याने वाढ होत आहे त्यातच पिकांवर कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध कीटकनाशकांची फवारणी करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे यावर्षी पहिल्यांदाच तेल्हारा तालुक्यातील कोठा येथिल प्रगशिल शेतकरी दिपक अहेरकर यांनी आपल्या सहा एकर शेतीत कांदा पिकाची लागवड केलेली आहे त्यांच्या कांदा पिकांत मोठ्या प्रमाणांत तण आणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असुन हे तण व किडीचा बंदोबस्त, व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात एकाच वेळी दहा मजूरांना फवारणी पंप घेऊन फवारणीला सुरूवात केली आहे.
साठवणूक करताना घ्यावयाची काळजी!
किटकनाशके कुलूप बंद ठेवावी, लहानमुलांपासून दूर ठेवावे, सूर्यप्रकाश व पावसाचे पाणी तसेच हवेची झुळूक याचे संपर्कात कीटकनाशक येणार नाही याची काळजी घ्यावी कीटकनाशके तणनाशके याची वेगवेगळी साठवणूक करावी.
फवारणी करतांना घ्या काळजी!
फवारणी करतांना नेहमी स्वच्छ पाणी वापरावे,गढुळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात फवारणी करु नये, हातमोजे,मास्क,टोपी, पुर्ण पॅन्ट,गाॅगल,हे संरक्षण साहित्य वापरल्या शिवाय द्रावन तयार करु नये, किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार नाही याची काळजी घ्यावी, नाक, कान, डोळे,व हात फवारणी होत असलेल्या औषधापासुन संरक्षीत राहतील याची संपूर्ण काळजी घ्यावी.फवारणी करतांना खाणे,पिणे, धूम्रपान करणे, तंबाखू खाणे,आदी अजिबात करू नये शिफारस केलेल्या तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा,अतितिव्रतेची औषधे वापरणे म्हणजे किडरोग नियंत्रित होते असे नाही किंबहुना त्यायोगे पर्यावरण व पिकांच्या स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो.











