अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : पोलीस स्टेशन मध्ये पातुर चे ठाणेदार हरीश गवळी आणि पोलीस कर्मचारी यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी दुपारी पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या वतीने राबविण्यात आला असून यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी पोलीस दादांना राखी बांधून हा उपक्रम पार पडला आहे.दरवर्षी हा उपक्रम पार पाडला जात असून यावेळीसुद्धा या महिलांनी हा उपक्रम पार पाडला आहे.यावेळी या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी श्रीधर पाटील, मोहन भोरस्कर ,रामेश्वर घोंगे ,सचिन पिंगळे, निलेश भगत ,अस्मिता बोर्डे ,विकास जाधव, दक्षता समितीच्या महिला भारतीताई गाडगे,प्रा.सौ. करुणाताई गवई ,रजीयाबी जब्बार हूसेन, प्रिया तेलगोटे , प्रिया कोथळकर, यांच्यासह इतर महिलांनी यावेळी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.