सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस स्टेशन अंतर्गत हिवरा खुर्द येथे 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11ते 2 सुमारास भुजंग विश्वनाथ कुटे वय 42वर्ष हीवरा खुर्द शिवारातील विहीरीवरील लोखंडी खिराडीला दोरीच्या सहाय्याने फाशी घेवुन विहीरीमध्ये लटकलेल्या अवस्थेत मरण पावलेला होता सदर माहिती पोलिस स्टेशन ला फिर्यादीचा चुलत भाऊ मंगेश कडुबा कुटे वय 38वर्ष यांनी तोंडी रिपोर्ट करून माहिती दिली आहे.
गावातील नागरिकांच्या चर्चे मधुन हात उसने पैशाला कंटाळून आत्महत्या केल्याचे गावातील नागरिकांना कडून सांगण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलं असा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने हिवरा खुर्द वासी यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये दुःख व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार दाखल नापोका चतरकर तपास अधिकारी इर्शाद पटेल अमोल बोर्डे, बीट , पोलीस पाटील गार्डे, तसेच गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने विहिरी मधील लटकलेले प्रेत वरती घेण्यात आले. या ठिकाणी गावातील उपसरपंच अशोक शिंदे व ग्रामपंचायत सदस्य सुनील उत्पुरे, संजय उतपूरे, उत्तम खरात व गावातील नागरिक व गावकरी मंडळी उपस्थित होते. पुढील तपास जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी इर्शाद पटेल अमोल बोर्डे व सहकारी करीत आहे.