गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक 23 8 2019 रोजी धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय मेंढपाळाचा असून तो व्यवसाय आज भितीमय वातावरणात सुरू आहे वन विभागाकडून अतिशय अन्याय मेढपाळावर सुरू आहेत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांना धमकावले जात आहे मेंढपाळ यांनी वन कर्मचारी यांच्यावर हल्ला केला असे दाखवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यांचे एक उदाहरण पिंपळगाव तालुका मोताळा वन क्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी अक्षरक्ष मेंढपाळ यांच्यामध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने बनावट गोळीबार प्रकरण रचुन 35 ते 40 मेंढपाळांनी हल्ला केल्याचा बनावा बनवि केली आहे तरी वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक लोखंडे यांना तात्काळ निलंबित करावे मेंढपाळांना जनावरांसाठी चाराई क्षेत्र उपलब्ध करून जनावरांचा चारा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्या मेढपाळावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे धनगर समाजाचा आर्थिक शैक्षणिक व सामाजिक दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने अनुसूचित जमातीच्या धर्तीवर धनगर समाजासाठी अनेक उपाययोजना शासनस्तरावरून टाकलेल्या आहेत त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होतांना दिसत नाही संबंधित कोणत्याही योजना योजनेचा निधी संबंधित कार्यालय प्रमुखास विचारणा केली असता निधी उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली आहे त्यामुळे समाजाच्या असणाऱ्या खालील उपाय योजना असून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही धनगर समाजासाठी पशुपालन योजनेचा निधी तात्काळ उपलब्ध करावा समाजातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासन निर्णय क्रमांक सीबीसी 20 एकोणवीस पत्र क्रमांक 121 योजना निधी मागील पाच वर्षांपासून उपलब्ध नाही त्यामुळे समाजाचा विकास थांबलेला आहे या व इतर मागण्या सह आज दिनांक 23 8 2021 रोजी ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदू भाऊ लवंगे विदर्भ अध्यक्ष सौ गिता ताई सोनोने धनगर समाज नेते शशिकांत तरंगे धर्मवीर आ संजय गायकवाड उषाताई चाटे पंचायत समिती सभापती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरे सचिन सपकाळ धोंडीराम कोळेकर संदीप काळवाघे संभाजी साळवे ग्रामपंचायत सदस्य देवधाबा सुनील नेमाडे ग्रामपंचायत सदस्य शिवलाल बोंद्रे यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते


