चिमूर तालुका शिवसेनाचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्रयाना निवेदन.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – नगर परिषद चिमूर येथे मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे स्थाई मुख्याधिकारी तत्काल नीयूक्त करण्यात यावा अशी मागणी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने मुख्यमंत्रयाना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. मागील दोन वर्षापासून चिमूर नगर परिषद मधे मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारीच्या भरोसावर चिमूर नगर परिषद चे काम थातुर मातुर सुरु आहे. या दोन वर्षात चिमूर नगर परिषद ने 3 प्रभारी मुख्याधिकारी बघितले, प्रभारी मुख्याधिकारी हप्पत्यातुन फक्त एक दिवस येत असल्याने चिमूर शहरातील विकासकामाना खिळ बसली असून नगरपरिषदचे काम राम भरोसे सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे नियोजन करण्यात नगर परिषद अपयशी ठरली असून, मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामासाठी वारंवार चकरा मारावा लागत आहेत. नगर परिषद च्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. करीता चिमूर नगरपरिषद ला स्थाई मुख्याधिकारी ताबडतोब नियुक्ति करावा. असी मागणी चिमूर तालुका शिवसेनाच्या वितिने मुख्यमंत्रि उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे कड़े उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फ़त दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे. निवेदन देते वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, चिमूर शहर प्रमुख सचिन खाड़े, उपशहर प्रमुख सुभाष नांनावरे, देवेंद्र गोठे उपस्थित होते.