कंञाटदार फिरकलाच नाही.
पाच दिवसाची मजुरी थकीत.
निलिमा बंडमवार
उप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/झिंगानुर- गडचिरोली जिल्हात सिरोंचा तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेले झिंगानुर परिसरातील नागरिक अजुनही तेंदुपत्याच्या मजुरीपासुन वंचीत आहेत.झिंगानुर परिसरातील पुल्लीगुडम,वडदेली, येडसिली, झिंगानुर चेक नं १, झिंगानुर चेक नं २, मंगीगुडम,झिंगानुर माल इत्यादी गावे असुन या परिसरात रोजगाराचा अभाव आहे.शेतीच्या भरोशावर नागरिक उदरनिर्वाह करतात.सिंचनाच्या साेयी सुविधांचा व साधनांचा अभाव असल्याने फक्त पावसाळी शेती केली जाते.कोणत्याही प्रकाराचे दुबार पिक घेतले जात नाही.त्यामुळे उन्हाळ्यात हमखास उत्पन देणारा हंगाम म्हणुन तेंदुपत्ता संकलन केले जाते.तेंदुपत्ता संकलना पासुन मिळणारा मजुरीवर कुटुबांचे उदरनिर्वाह केले जाते.
झिंगानुर ग्रामपंचायतमध्ये कंञाटदाराच्या उपस्थितीत हंगामापुर्वी लिलाव प्रक्रीया पार पडली होती. ७० पानाचे प्रतीपुडा ११ रूपये प्रमाणे दर ठरविण्यात आले होते. त्या प्रमाणे परिसरातील नागरिकांनी मागील हंगामात आठ दिवस तेंदुपत्ता संकलनाचे काम केले होते.यापैकी तेंदुपत्ता कंञाटदाराने तिन दिवसाची मजुरी दिली.उर्वरित पाच दिवसाचे तेंदुपत्ता संकलनाची मजुरी लवकरात लवकर आणुन देण्याचे सांगण्यात आले.माञ तिन महीने लोटुनही कंञाटदार या परिसरात फिरकलाच नाही व नागरिकांना मजुरी दिलीच नाही.येथील नागरिक कंञाटदाराच्या प्रतिक्षेत आहेत.सध्या खरिप हंगाम असल्याने शेतीसाठी लागणारे किटकनाशके,खते व अन्य वस्तु खरेदी कराव्या लागतात.शेतातील मजुरांना मजुरी द्यावे लागते माञ तेंदुपत्ता संकलनाची मजुरीच न मिळाल्याने या परिसरातील नागरिकांना मोठ्या आर्थीक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे कंञाटदाराने तेंदुपत्याची मजुरी लवकरात लवकर द्यावी.अशी मागणी झिंगानुर परिसरातील नागरिकांनी केली आहे.


