निलिमा बंडमवार
उप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/तुळशी- आरोग्य प्रबोधिनी, आदित्य बिर्ला एज्युकेशन टस्ट व समाजबंधच्या सहाय्याने तुळशी येथे मासिक पाळीचे आरोग्यदायी नियोजन या विषयावर सत्र घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य गुणाजी झाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सचिन रामटेके , विद्या दुनेदार , आरोग्य प्रबोधिनीचे कार्यवाहक डाॕ. सुर्यप्रकाश गभणे ,विष्णू दुनेदार ,कौशिक सुकारे ,मार्गदर्शक म्हणून समाजबंधचे सचिन आशा सुभाष उपस्थित होते.या सत्रा दरम्यान आरोग्य प्रबोधिनीच्या पुढाकाराने तुळशी येथिल महिला व मुली यांना शास्त्रशुद्ध माहिती देत पौगंडा वस्थेत होणारे शारीरिक भावनिक बदल, पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आहार, स्वच्छतेच्या सवयी, शोषक साहित्याचा वापर व विल्हेवाट या विषयी हसत खेळत माहिती देण्यात आली. शिवाय पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करत पाळीविषयी शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यावर भर देण्यात आला. सत्रानंतर कार्यक्रमाचे प्रायोजक आदित्य बिर्ला एजुकेशन ट्रस्ट मार्फत मुलींना मोफत पॅडचे ही वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात या विषयी असणारा संकोच व अज्ञान दूर करण्यासाठी बिर्ला ट्रस्टने उजास या कार्यक्रमा अंतर्गत सत्र आयोजित करण्यात आला होता.सत्रा दरम्यान ५० महिला व मुलींना या माध्यमातून माहिती देण्यात आली. मुलींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत हा कार्यक्रम यशस्वी केला. यासाठी शिक्षक व ग्रामपंचायतींचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमात प्रास्ताविक डॉ. सुर्यप्रकाश गभने यांनी केले.संचालन विष्णु दुनेदार यांनी तर आभार विद्या दुनेदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती पुराम, ईशा लोणारे,कावेरी दुनेदार ,किरण शेंडे , माहेश्वरी मारबते , ममता नागरे ,खुशी मेश्राम ,देवयानी सुकारे,मैथिली भरणे ,चैतन्या दुनेदार यांनी सहकार्य केले.











