अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर (दि २० ॲागष्ट, २०२१):-
स्थानिक डॅा. एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना द्वारा मा. प्राचार्य डॅा किरण खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या परिपत्रकानुसार दिवंगत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हनुन साजरा झाला.याप्रसंगी विचार पिठावर एन एस एस समन्वयक डॅा.रोनील आहाळे उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा रोनील आहाळे यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॅा ममता इंगोले यांना कोरोना योध्दा म्हणुन पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मा. प्राचार्यांच्या हस्ते त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून विचार मांडतांना प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी सांगीतले की,राज्यातील, देशातील विविध प्रेदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे हा प्रमुख उद्देश सद्भावना दिवस साजरा करण्यामागे आहे.राजीव गांधी पंतप्रधानपदी रूजू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या धोरणांमधून विकसित भारताचं स्वप्न देशाला दाखवलं.“विकास म्हणजे कारखाने, धरणे आणि रस्ते यांचा नाही. विकास हा लोकांबद्दल आहे. लोकांसाठी भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पूर्तता हे ध्येय आहे. विकासात मानवी घटक सर्वोच्च मूल्य आहे.” त्याचप्रमाणे शिक्षण हे आपल्या समाजात एक उत्तम बरोबरी करणारे असले पाहिजे. आपल्या विविध सामाजिक व्यवस्थांनी गेल्या हजारो वर्षांमध्ये निर्माण केलेले मतभेद समतल करण्याचे हे साधन असावे.”आज आपले कार्य भारताला एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आणणे, दारिद्र्याच्या ओझ्यापासून मुक्त करणे, आपल्या वसाहतीतील भूतकाळाचा वारसा आणि आपल्या लोकांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहे.” भारताच्या सशक्त, स्वतंत्र आणि स्वावलंबी आणि मानवजातीच्या सेवेत जगातील राष्ट्रांच्या पहिल्या क्रमांकाचे स्वप्न पाहणे हे सत्यात साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन डॅा. दिपाली घोगरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा अरविंद भोंगळे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॅा.व्ही जी वसु, डॅा. ममता इंगोले,प्रा. अतुल विखे, प्रा. दादाराव गायकवाड, डॅा.संजय खांदेल, प्रा हर्षद एकबोटे, डॅा. अनिल देशमुख, प्रा राहुल माहुरे, प्रा विजया साखरे उपस्थीत होते.