गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील नदीपात्रात शनिवारी दुपारच्या सेल्फी घेण्याच्या नादात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात आढळून आला. मृतकाचे नाव अनिल रामकृष्ण सरोकार वय 24 राहणार खांडवी, तालुका जळगाव जामोद असे या युवकाचे नाव असून तो गृहरक्षक दलाचा जवान असल्याचे समजते.जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील अनिल रामकृष्ण सरोकार हा शनिवारी सेल्फी काढण्यासाठी नदीपात्रात उतरला असता, सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडून वाहून गेला. हनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदी दुधडी भरून वाहत होती. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सदर व्यक्ती वाहून गेला.मृत व्यक्ती रविवारी सकाळी १०.३० वाजता नदी पात्रात वाहत असताना वारखेड येथील शेतकरी राजू पांडुरंग म्हसाय यांना प्रथम दर्शनी आढळून आली त्या नंतर त्यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली.मृतकाच्या नातेवाईकांनी व सोनाळा पोलिस स्टेशनला दिली शनिवार ला दिली असल्याचे समजते.मात्र सदर मृतक हा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने हिवरखेड चे ठाणेदार धिरज चव्हाण, बिट जमादार ,श्री, सुरवाडे, प्रफुल पवार, प्रवीण गवळी, दानापूर चे पोलीस पाटील संतोष माकोडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी तेल्हारा येथे पाठवण्यात आला.