गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा येथून जवळच असलेल्या बेलखेड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास हिवरखेड वरून तेल्हारा येणारी एसटी बस अचानक रस्त्याच्या खाली घसरली या रस्त्याची अवस्था बिकट असल्याने ही घटना घडली. मात्र या घटनेमध्ये कुठलीही हानी झाली नसली तरी प्रवाशांनी प्रशासन व शासनाबद्दल रोष व्यक्त केला संततधार सुरू असलेल्या पाण्यामुळे सर्व रस्ता खराब झाला .असल्यामुळे तेल्हारा आगार ची बस क्रमांक MH 30 1828 अचानक अंबिका माता मंदिराजवळ रस्त्याखाली घसरल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही आतापर्यंत या खराब झालेल्या रस्त्यावर अपघात होऊन कित्येकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. काहींना तर आपल्या जीवाला मुकावे लागले आहे गेल्या दोन वर्षापासून हा रस्ता असाच खराब अवस्थेत दिसत आहे. प्रत्येकांनी आंदोलने रस्ता रोको उपोषण अशा बरेच प्रकारचे शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा अद्याप पर्यंत काही उपयोग झाला नाही रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.