किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : रक्षाबंधनाच्या पर्वावर पातूर येथे किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. पातूर येथील किज्प रेड एस पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती प्रेम निर्माण व्हावे तसेच त्यांना निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने अनोखे रक्षाबंधन हा कार्यक्रम राबविण्यात आला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.
शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या अंगणात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर या झाडांची रक्षा करून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली. या उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या उपक्रमाकरीता शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, वंदना पोहरे, नरेंद्र बोरकर, सुलभा परमाळे, नितु ढोणे,किरण दांडगे,शितल कवडकर,अश्विनी अंभोरे, जयेंद्र बोरकर,बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, रूपाली पोहरे,शुभम पोहरे आदींनी मार्गदर्शन केले.