अजिंक्य मेडशिकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
विषमुक्त शेती अभियान अंतर्गत वाशिम जिल्ह्यात डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला व सेवा प्रदाता संस्था सर्ग विकास समिती यांच्या वतीने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरवात डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार घालून व दीप प्रज्वलन करून झाली. करडा कृषी विद्यापीठाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी शेतकरी वर्गाला विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याच महत्व पटवून जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने या कडे वळावे व विषमुक्त अन्न स्वतःच्या शेतात पिकवून ते स्वतः पण खावे व इतरांना पण द्यावे व कॅन्सर सारख्या आजारा पासून स्वतः व समाजाला दूर ठेवावे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षना मध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले . १) सेद्रिय शेती प्रमाणीकरण व कार्यपध्दती , २) शेतकरी दैनंदिनी व गट स्तरीय दस्तावेज ३) शेतातील किड रोग निरीक्षण व सर्वेक्षण ४) सेंद्रीय पध्दतीने किड रोग व्यवस्थापण ५) वनस्पतीजन्य किटक नाशके इत्यादी, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत द्वितीय प्रशिक्षण घेण्यात आले.एकूण दहा शेतकरी गटांच्या संयुक्तरित्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना प्रोजेक्टर द्वारे पीपीटी दाखवून श्री शंकर शिंदे सर व श्री शिवाजी भारती सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाकरिता मास्टर ट्रेनर श्री श्रीकृष्ण शिंदे व श्री संजय मांडवगडे साहेब व श्री हरीश आवचार साहेब यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले तसेच सर्व गटांचे अध्यक्ष व सचिव यांचे सहकार्य लाभले सोबतच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी समृद्धी जैविक शेतीकरी गट व शिवसुत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सदर कार्यक्रमाला डॉ हेमंत देशमुख, दत्तराव घुगे, मनोज देशमुख, नंदू लहुडकर, प्रकाश दहात्रे व अजिंक्य मेडशिकर यांच्यासह गटातील शेकडो शेतकरी वर्ग उपस्थित होता