कार चालकाचे सुटले नियंत्रण तीन जण ठार पाच जण जखमी
पवनसिंग तोडावत
ग्रामिण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: आग्रा महामार्गावरील बाबळी फाटयाजवळ जलशुद्धीकरण केंद्रासमोर उज्जेन कडे जात असताना कारचा अपघात झाला.या अपघातात कन्नड येथील 3 भाविक ठार झाले आहेत. 2 जण गंभीर जखमी तर 3 जण जखमी झालेले आहेत.अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.हे भाविक श्रावण मासानिमित्त कन्नड होऊन उज्जेन येथील महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.रात्री1 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
महाकाल दर्शनासाठी कन्नडहुन हे भाविक कारणे एमएच 22 यु 7128 निघाले होते. मुंबई आग्रा महामार्गावरील बाबळी फाटयाजवळ येताच त्याच्या कारचे टायर फुटले त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हि कार उलटून 300 मीटर अंतरापर्यत उलटत गेली.घडलेल्या भीषण अपघातात गणेश हिरे (26) सचिन राठोड (27) पवन जाधव (24) सर्व रा.कन्नड हे ठार झाले आहेत.तर सागर पाटील,गौरव कांबळे,किशोर राठोड,नवनाथ बोरसे,शिवाजी जाधव सर्व रा.कन्नड हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे,पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी अपघात स्थळी भेट दिली.या घटनेमुळे शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.











