अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर 21 ऑगस्ट 2021 स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे 18 ऑगस्ट सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ‘एन डी ए ची पूर्व परीक्षा मुली सुद्धा देऊ शकतात’ स्वागत करण्यात आले.11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला अंतर्गत एन सी सी युनिट तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे 1961 साली स्व. सरलाबाई गहिलोत यांच्या नेतृत्वात युनिट ची स्थापना करण्यात आली. आणि आत्तापर्यंत 62 वर्षांमध्ये विद्यालया मधून हजाराहून अधिक मुली एनसीसी पास करून निघालेल्या आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलींना सुद्धा एनडीए ची पूर्व परीक्षा देऊन देशाच्या सीमेवर संरक्षण करता येऊ शकते हा आत्मविश्वास मुलींमध्ये निर्माण झालेला आहे, म्हणून या निर्णयाचे स्वागत विद्यालयामध्ये वृक्षारोपण करून जल्लोषात करण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए ची पूर्व परीक्षा देऊन मुली सुद्धा यामध्ये प्रवेश घेऊ शकतात.ए एन ओ ऑफिसर एनसीसी चे स्व. श्रीकृष्ण माणिकराव सर स्व. अजयसिंह गहिलोत सर स्व. हरीश काळे सर यांनी सांभाळली. आणि आज रोजी विद्यालयात सतरा विद्यार्थिनी एनसीसीमध्ये सहभागी आहेत.या निर्णयाचे स्वागत संस्थेचे सचिव स्नेहाप्रभादेवी गहिलोत, व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, प्राचार्य बी एम वानखडे , उपप्राचार्य एस बी ठाकरे, अंशुमनसिंग गहिलोत आणि एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांनी केले.
स्वर्गीय अजयसिंह गहिलोत सरांनी एनसीसीला दिली होती नवी चकाकी…
विद्यार्थी प्रतिक्रिया –
एकता आणि शिस्त याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एनसीसी आहे याचे प्रशिक्षण आम्ही विद्यालयात घेत आहेत आणि हाच ध्यास ठेवून भविष्यात देशाचे संरक्षण करण्याकरिता आम्ही सीमेवर लढण्याकरिता कंबर कसून आहोत.
जे.डब्ल्यू कोमल सुरवाडे, सार्जंट आणि सचिव, पोलीस बॉईज संघ पातुर.
माझी सुद्धा स्वप्न आहे देशाचे संरक्षण सीमेवरती जाऊन करायचे आहे आणि मोठे ऑफिसर बनायचे आहे.
कॅडेट भक्ती रमेश इंगळे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)