महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि : 22:-अळी, कीटक, पिकावरील रोग ही बाब शेती व्यवसायामध्ये नेहमीची आहे परंतु दहा वर्षे पूर्वी लष्करी अळीने ज्याप्रमाणे आपल्या विभागातील संपूर्ण सोयाबीनची उभी पिके नष्ट के ली होती त्याच प्रकारची लष्करी अळी यावर्षी नुकतीच पाहायला मिळत आहेत याचे सर्वेक्षण काही गावांमध्ये किसान पुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे क्षेत्रातील वाघेडा, धानोली, पिरली , जेना, धामणी, नंदोरी टाकळी या गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काहीअळी आढळून आली आहे.रात्री तून पूर्ण सोयाबीनचे प्लॉटचे प्लॉट नामशेर्ष करताना दिसत आहे काही वर्षाांमध्ये एक – एक वर्षया मध्ये लक्षात येत आहे की दहा वर्षापूवी ज्याप्रमाणे अळी आली होती त्याच प्रमाणे पुनरावृत्ती होते की काय अशी भीती शेतकऱयांमध्ये निर्मान झाली आहे.या समस्येकडे प्रशासन, कृर्षी विभाग व शासन यांनी सामूकहकिणे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱयांची हाती आलेले सोयाबीन पीक क्षणात नष्ट होऊन शेतकऱयावर उपासमारीची पाळी येणार आहे.आज पर्यंत सोयाबीन पिकावरील लष्करी अळीच्या संदर्भात शासनातफे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही बाजार पेठे मध्ये सोयाबीनच्या भावाला उच्चांकी असलेल्या दर पाहता व सध्याची सोयाबीनची उभी असलेली पिके पाहता या वर्षी शेतकरी हा सुखावतील असे वाटत होते परंतु वेळीच त्यावर उपाययोजना न झाल्यास हाती आलेले पीक जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सर्व शेतकरी बांधवानी तात्काळ अळीवर्गिय कीटकनाशकांची फवारणी करावी ही विनंती किसान पुत्र शेतकरी समूहाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांचे वतीने करण्यात येत आहे.











