योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील तळोधी बा. वरून जवळच असलेल्या येनोली माल येथील ३ गावाचा समावेश करून गट ग्राम पंचायत असून या गावात लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकार यांच्या २ वर्षाच्या कारकिर्दीत धामणगाव (चक) येथे शुद्ध पिण्याचे पाण्याचे फिल्टर, जि. प. शाळा सोलर लावणे, नाली बांधकाम, धामणगाव (माल) येथील अंगणवाडी बांधकाम, धामणगाव (माल) येथील गावात सोलर नळ योजना, येनोली (माल) येथील मागासवर्गीय वस्तीत मध्ये बगीचा बांधकाम व बिरसा मुंडा स्मारक पूजन अश्या विविध योजना राबविण्यात आल्या असून यांचे आज गट ग्राम पंचायत येनोली माल अंतर्गत लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे धामणगाव (चक) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन धामणगाव (चक) येथील नंदकिशोर रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन धामणगाव (चक) येथील युवक अक्षय मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सतीश वारजूरकर जि. प.सदस्य तथा गट नेते चंद्रपूर, प्रफुल खापर्डे सभापती पं. स. नागभीड, खोजाराम मरसकोल्हे जि. प. सदस्य चंद्रपूर, सुषमा खामदेवे पं. स. सदस्य नागभीड, होमराज लांजेवार जिल्हा अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर, अमोल बावनकार सरपंच, अर्चना मेश्राम उपसरपंच, राजू झोडे ग्रा.प.सदस्य, महादेव इंदूरकर ग्रा.प.सदस्य, वर्षा सोनवाणे ग्रा.प.सदस्य, ज्योती मेश्राम ग्रा.प.सदस्य, संगीता घुगुस्कर ग्रा.प.सदस्य, धोतरे ग्राम सेवक, रामदास बोरकर ग्रा.पं. कर्मचारी,आनंदराव सोनवाणे ग्रा.पं. कर्मचारी, विजय सोनवाणे ग्रा.पं. ऑपरेटर, पुंडलिक उईके, शिला ठोंबरे सरपंच सोनापूर, नरेंद्र रामटेके माजी सदस्य व येनोली (माल), धामणगाव (माल) व धामणगाव (चक) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.