सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणार्या ई पिक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मा.मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे दि 13 आॅगस्ट रोजी करण्यात आली त्या अनुषंगाने मेहकर तहसीलदार संजय गरकल यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 20 ,वेळ सायंकाळी 5 वाजता , मौजे कळबेंश्वर येथे सरकारी दवाखान्यात सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये शेतकऱ्यांना ई पिक पाहणी कशी करावी व कोणती माहिती भरावी या बाबतीत माहिती देण्यात आली त्यावेळी मंडळ अधिकारी गणेश महाजन तलाठी एस एस सोळंके सुमेध तायडे राम नवघरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सारसीव थार कासार खेड खुदनापुर कळबेंश्वर येथिल शेतकरी मोठ्या प्रमाणावर हजर होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू डगडाळे प्रमोद मिश्रा समाधान खरात गजानन कानोडजे यांनी परिश्रम घेतले..