महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.21:-येथील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील बजरंग किराणा स्टोर्स च्या बाजुच्या गल्लीत भला मोठा अजगर आढळून आला असून त्याला वनविभागाच्या हवाली करुन जीवदान देण्यातआले.प्राप्त माहितीनुसार, दि.१७ आॅगस्टच्या रात्री १२.३० वाजताचे दरम्यान भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी बजरंग किराणा स्टोर्सच्या बाजुच्या गल्लीत भला मोठा साप असल्याचे सर्पमित्र राज येरणे यांना सांगितले. ते एकटेच भर पावसात साप असलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांना भला मोठा अजगर गल्लीमध्ये दडून बसलेला दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो भिंतीला ठोकलेल्या बाथरुमच्या आऊटलेटच्या पाईपमध्ये शिरला. त्यामुळे सदर पाईप कापून अजगराला येरणे यांनी बाहेर काढले. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी वनविभागाच्या कार्यालयात नोंद करुन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी सर्पमित्र श्रीपाद बाकरे,शुभम मुरकुटे, शितील माशितकर, अमर किन्नाके आणि इतर युवकांनी सहकार्य केले.