सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील शेतकऱ्यांना चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा व पाण्याअभावी माना टाकणाऱ्या पिकांना जीवनदान देत तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले असून मंगळवारी मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत मेहकर तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.सतत पाऊस सुरू असल्याने बळीराजा अडचणीत वाढ होत आहे. बर्याच दिवसांपासून पाऊस नव्हता तेव्हा मुग उडीद सोयाबीन कापूस पिकावरील रोग व आळी औषध फवारणी साठी हाजोरो रूपयांचे खर्च करून आळी आटोक्यात एत नसल्याने शेतकऱ्यांनी धिर सोडला नव्हताच.त्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यातुन पावसाच्या सरी बरसत काही काळापुरता बळीराजा सुखावला . या पावसाने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले याचा.आनंद झाला सतत तिन चार दिवस पाऊस उघड छाप सुरू आहे तर काही ठिकाणी मुसळधार झाला त्यामध्ये सोयाबीन उडीद कापूस इ मुंग पिकांच्या शेंगा मधुन तुरे बाहेर आले आहे तर सोयाबीन व उडीद पिक लोळले आहे. हजारो रुपये खर्च करून तोडांशी अलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.











