गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना ने गेल्या मागील वर्षी पासून धुमाकूळ घातला असून तेच नियम नाशिक जिल्ह्यात थोडे निर्बंध शिथिल होत असतानाच आज गावांतील रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची विशेष खबरदारी घेतली असून हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. त्यांनी माहिती दिली की ह्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर उपचार होऊ शकतो. रूग्णांमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट डेल्टा प्लस व्हरिएंट नाही. त्यामुळे खबरदारी घेत आहोत घाबरून जाण्याचं काहीही कारण अशीही माहिती जिल्हा अधिकारी यांनी दिली आहे. त्वरित खबरदारी घेण्यासाठी आवाहन केले आहे
जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे. सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.अशी माहिती नाशिक जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी यांनी दिली आहे.