अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांनी सार्वजनिक अभिलेलख नष्ट केल्याप्रकणी आरटीआय कार्यकर्ता कैलास आत्माराम बनसोड यांनी उपविभागीय अधिकारी वाशिम यांच्याकडे दोषींवर द्रव्य दंडासह फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.रिधोरा येथील केशव लक्ष्मण अवचार तलाठी यांच्या शिधा पत्रिका प्रकरणी मालेगाव पुरवठा विभागातून दस्तावेज विना परवानगी नष्ट केल्याचे आरटीआय कार्यकर्ते कैलास बनसोड यांनी मागितलेल्या माहिती अधिकारा अंतर्गत उघड झाले आहे.सदर प्रकरणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19 (1) नुसार प्रथम अपील तहसिलदार मालेगांव यांच्याकडे करण्यात आले होते.सदर अपील प्रकरणी सुनावणी ठेऊन सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 तरतूदी नुसार आदेश करणे आवश्यक होते मात्र तसा आदेश पारित करण्यात आला नाही त्यामुळे सार्वजनिक अभीलेख अधिनियम 2005 कलम नुसार द्रव्य दंडासह फौजदारी कारवाई करण्याची मागणी बनसोड यांनी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत केली आहे. तक्रारीच्या प्रति विभागीय आयुक्तांकडे आणि जिल्हाधिकारी वशिम यांना देण्यात आल्या आहेत सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकारी सार्वजानिक अभिलेख अधिनियम 2005 प्रमाने काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.कार्यालयात येणारा कोणताही कागद हा सार्वजनिक आहे. सदर दस्तावेजाचे जतन करण्याचा कालावधी सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 च्या कायद्याने आकृती करून दिला त्यानुसारच कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मालेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी आपल्या मर्जीने शिधापत्रिका निर्माण करण्यासाठी निर्माण झालेले कागदपत्र संबंधित लोकांच्या फायद्यासाठी वरिष्ठांची परवानगी न घेता व नष्ट केलेल्या कागदाच्या नोंदी न घेता मनमानी करू सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 या कायद्याचा भंग केला आहे त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते कैलास बनसोडे यांनी उपविभागीय अधिकारी वाशिम यांच्याकडे केली आहे.