वृषभ दरोडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथे कित्येक वर्षापासुन देशी दारू तसेच हातभट्टिचा व्यवसाय जोरात सुरू होता गावातील काही बचत गटाच्या महिलांनी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राळेगाव ठाणेदार यांना दोन वर्षा अगोदर आंजी गावातील दारु बंद करण्यासाठी निवेदन दिले होते निवेदन देताच राळेगाव पोलीसांनी आंजी येथील दारु बंद केली होती. अशातच देशावर करोना या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय गेले त्यामुळे कमि वेळात जास्त पैसा कसा कमवायचा म्हणून आंजी येथील काही आंबट शौकिनांनी शक्कल लढवत देशी दारू व हातभट्टिचा व्यवसाय जोरात सुरू केला विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हा परिषद ची शाळा आहे त्याठिकाणी दारु विक्री केली जाते हे मात्र विशेष. बंदच्या दिवशी या गावाला जत्रेचे स्वरूप येते गावांमध्ये दररोज छोटे मोठे वाद दररोज निर्माण होतांना दिसतात. गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या दारुविक्रेत्यांना गावात दारू विकु नका अशी समज सुद्धा दिंल्या गेली पण हे मुजोर विक्रेते कोनाचेही ऐकाला तयार नाही आम्ही दारू विकिन आमचे कोन काय करू शकते असे उद्धट भाषेत बोलल्या जाते असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. अशातच आज दिनांक सहा रोजी राळेगाव पोलीस स्टेशनला दारू विक्रिची गुप्त माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे हेडकॉन्स्टेबल लडके पोलिस नाईक योगेश डगवार पोलिस शिपाई राहुल मोकळे, सचिन नेहारे पोलिस वाहन चालक सुरज यांनी आरोपी सुर्यभान शेंद्रे राहनार आंजी वय वर्षे पसतिस या दारु विक्रेत्यांकडून एकुण सात पेट्या देशी दारू 343 नग अदांजे किंमत 20580 व एका निळ्या डबक्यात बारा लिटर गावटी हातभट्टी ची दारूची किंमत 2400 रुपये असा एकुण 22980 रुपयाचा माल जप्त आरोपी विरूद्ध कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करन्यात आला आरोपी मात्र पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला या कार्यवाहिचे आंजी येथील महिलांनी राळेगाव पोलीसांचे आभार मानले पुढिल तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे करत आहे


