कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
भारतीय मजदूर संघ संलग्नित अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचे राष्ट्रीय स्तरावर संयुक्त महामंत्री म्हणून प्रकाश बोदडे यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली.मध्यप्रदेश मधील रतलाम येथे बुधेश्वर सभागृह या ठिकाणी अ.भा.वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचे सातवे अधिवेशन १५ व १६ एप्रिल रोजी पार पडले यामधे संपूर्ण भारतातून विविध राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.१५ एप्रिल ला मध्यप्रदेश शासनाचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव व भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री व्ही.सुरेंद्रनजी यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले.संघटनेच्या ध्येय धोरणा नुसार व कार्य विस्तारा करिता दर तीन वर्षांनी महासंघाच्या कार्यकारिणीची निवडणूक होते यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मध्यप्रदेश भा.म.संघाचे प्रदेश अध्यक्ष संजयसिंह यांनी सर्व संमतीने पुढील कार्यकारिणी ची घोषणा केली त्यामधे आपले महाराष्ट्रातील सोनाळा जि.बुलढाणा येथील निवासी प्रकाश बोदडे यांची संयुक्त महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आता पर्यंत ते वनवासी ग्रामीण चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम बघत होते.अनुपपुर येथील कृष्णकुमार बैगा यांची महामंत्री तर अखिल भारतीय अध्यक्ष झाबुवा चे राधूसिंह भावर, छत्तीसगढ चे अर्जूनराम यांची कार्यकारी अध्यक्ष,उपाध्यक्ष म्हणून राजा राज प्रतापसिंह,रघुनाथ झारिया,श्रीमती रंगा मौरी,राष्ट्रीय संघटनमंत्री जितेंद्रसिंह गुर्जर सोबतच मंत्री म्हणून भगवतीलाल मिणा,श्रीमती सोनिया कुमरे,भैरू लाल खदेडा कोषाध्यक्ष म्हणून भरत पाटीदार डॉ.विक्रम रघुवंशी को सह कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.प्रकाश बोदडे यांचे नियुक्ती ने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.


