सुनील रामटेके
शहर प्रतिनिधि भद्रावती
युगपुरुष, भारतीय लोकशाहीचे जनक, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करन्यात आली. जगातील सर्वात मोठा ऊत्सव ” भिमऊत्सव ” भद्रावती येथे आंबेडकर चौक येथे असंख्य भिमसैनिकांनी बाबाससाहेबांच्या महान कार्याचे स्मरण आणी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत साजरा केला.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हे तर सामाजिक समतेचे महान प्रतिक होते .त्यांनी आपल्या आयुष्यातुन शिक्षणाचे महत्त्व,सामाजिक सुधारणा आणी शोषित व वंचित वर्गाच्या हक्कासाठी संघर्ष केला.त्यांचा त्याग, संघर्ष व योगदान संपूर्ण जगाला स्मरण रहावे म्हणून प्रत्येक भारतीयांनी हा दिवस एक ऊत्सव म्हणून साजरा केला पाहिजे.असे विचार ऊपस्थित मान्यवरांंनी या प्रसंगी व्यक्त केले.आंबेडकर चौक निळे झेंडे, पताका, बॅनर्स,स्वागत कमानींनी सजविन्यात आला होता. संध्याकाळी फटाक्यांच्या आतिशबाजीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक ते बाळासाहेब ठाकरे चौक व परत आंबेडकर चौक पर्यंत “भव्य भिमसैनिक रॅली” काढन्यात आली.या रॅलीमधे असंख्य उपासक व उपासकांनी ढोल,ताशा लेझीम नृत्य सादर केले,डि जे च्या आवाजावर ठेका धरला होता. ” बाबासाहेब अमर रहे व जय भीम ” च्या नाऱ्यांनी परीसर भिममय झाला होता.हा जयंती उत्सव यशस्वी करन्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती चे पदाधिकारी ॲड.भुपेंद्र रायपुरे सर,डाॅ.अमीत नगराळे,विशाल बोरकर, खुशाल मेश्राम, शंकर मुन, बंडू देवगडे, सर्वेश चहांदे, उमेश रामटेके, नाना भाऊ देवगडे, सुशील देवगडे, सुरज गावंडे, राहुल सोनटक्के व सदस्यांनी परिश्रम घेतले.


