गोपाळकुमार कळसकर
तालुका प्रतिनिधी, भुसावळ
मातोश्री आनंदाश्रम याठिकाणी गेल्या वर्ष भरापासून समाजकार्य विभागाचे विद्यार्थी क्षेत्रकार्य करत होते. यादरम्यान वृद्धाश्रमातील आजी – आजोबांशी एक भावनिक ऋणानुबंध व कायम स्वरूपीचे असं घट्ट नातंच जणू या विद्यार्थ्यांचे निर्माण झाले. आज क्षेत्रकार्याचा शेवटचा दिवस असल्याने आपण आजी – आजोबांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे, जे कायमस्वरूपी स्मरणात राहील याच निर्धाराने समाजकार्य विभाग,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव येथील विद्यार्थ्यांद्वारा आज श्री श्री श्री 1008 अ ठरा पुराण कथाकार महामंडलेश्वर स्वामी माधवानंदजी सरस्वती यांचे कीर्तन आयोजीत करण्यात आले होते. यावेळी स्वामीजिंनी गीतेचा १८ वा अध्याय सविस्तर विवेचन करत सोबतच जगण्याचे तत्वज्ञान मांडले संतांचे बोल समुद्रापेक्षाही खोल अशा आशयाची एकंदरीत मांडणी केली. यावेळी परिसरातील आजी – आजोबा मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेतील कर्मचारी समाजकार्य विभागाचे सहा. प्रा. योगेश माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लोकेश कोळी, सुदाम गावित, सागर जाधव, सुनीता बहिरम, रुपाली गवळी यांनी केले.


