व्येकटेश चालुरकर तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी राज्यघटनेच्या शिल्पकाराला प्रेरित असलेली व समाजाला समता, स्वातंत्र्य, हक्क व जबाबदाऱ्या प्रेरित लोकशाही सोडून देशात मागच्या दराने विषमतावादी लोकशाही जनतेवर लादली जात आहे. तिला वाचवीने आपणा सर्वांचे कार्य असल्याचे प्रतिपादन भडंत ज्ञानज्योति महाथेरो यांनी केले. बुद्धाच्या मार्गानेच कल्याण होत असल्याचे सुद्धा त्यांनी येथे म्हणाले. डॉ. बाबासाहेब चारिटेबल ट्रस्ट, पंचशील बौद्ध समाज मंडळ व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बुद्ध व डॉ आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण व प्रबोधन मेळाव्याचे ते बोलत होते.पोलीस प्रशासनाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध या शांतीचा संदेश देणाऱ्या पुतळ्यांनाअनावरणाला परवानगी मिळाली नाही. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प अध्यक्ष अजय कंकड्यालवार यांनीही बाबासाहेबांच्या संविधानामुळे मला राजकीय पद भूषविण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोंडवाना विद्यापीठाचे प्रा डॉ संतोष सुरडकर, दि बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष धर्मानंद मेश्राम, संदीप भाऊ कोरेत, यांनीही बाबासाहेब व आजची परिस्थिती यावर मार्मिक भाषणे दिलीत.प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वर्षा पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, चंद्रकांत कोरडे, बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक मंडळ अहेरीचे अध्यक्ष रतन दुर्गे ,गिरीश मदेरलावार, ग्रामपंचायत सदस्य शालिनीताई कांबळे, संतोष मढीवार ,तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रुषी सुखदेवे यांचे मंचावर उपस्थित होते.पुतळा करिता राजू जुनघरे यांनी जागा दिली.रात्री झालेल्या कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र तावाडे तर संचालन डॉ तुळशीराम कांबळे अध्यक्ष दामोदर वाघाडे तसेच सुनिल झाडे गणपत तावाडे यांनी केले. आजूबाजूच्या खेड्यातून बऱ्याच नागरिकांनी मेळावा व रात्री कवालीचा मनसोक्त आनंद घेतला.


