गावात बोद्ध समाज नसताना गावामध्ये केली भीमजयंती साजरीमारोती बारसागडेजिल्हा प्रतिनिधी गडचिरोलीगडचिरोली/चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे बोद्ध समाजाचे एकही घर नसताना दुसऱ्यांदा विश्वात्म परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि गावामध्ये नवीन पाया रचून बाबासाहेबआंबेडकरांबद्दल ची माहिती गावासभोवताल पटवून देण्याचा आणि दरवर्षी समाजात जाती धर्मात एकोप्याने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.लखमापूर बोरी वासियांना महात्मा ज्योतिबा फुले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात सुद्धा देव दिसायला लागला आहे.त्यामुळे यांच्या जयंत्या ते सर्व समाजाला मिसळवून एकोप्याने नेहमी साजरे करू असे जितेश देवगडे यांनी कार्यक्रमात आपल्या प्रास्ताविकेत सांगितले.आज आम्ही बाबासाहेब शिक्षणातून शोधत आहोत आणि शोधता शोधता एक दिवस ते आम्हाला मिळतीलच या अपेक्षेने जयंती साजरी करीत आहोत असे रुदया संस्था गडचिरोली चे संस्थापक व लखमापूर बोरी चे जन्मस्थान असलेले काशिनाथ जीं देवगडे यांनी आपल्या मनोगातून भावना व्यक्त केल्या.आम्ही सगळे एकच आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आहेत कुण्या एका समाजाचे नाहीत हे लखमापूर बोरी वासियांनी अख्या राज्याला दाखवून दिले आहे.जयंती कार्यक्रमात जिह्वा परिषद गडचिरोली चे माजी उपाध्यक्ष डॉ टी.एम दूधबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती.वेशभूषा स्पर्धेत संयुक्तरीत्या प्रथम बक्षीस म्हणून चित्रा महादेव सातपुते व दुर्वा संदीप वैरागडे यांना ग्रामपंचायत सदस्य भाग्यवान पीपरे यांच्या हस्ते संविधान पुस्तकं देऊन गौरविण्यात आले. त्यांनतर गावातून घोडस्वार रथ घेऊन ढोल ताशाच्या गजरात व सर्व समाजातील लोकांना एकत्रित करून मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व समाजातील नागरिकांनी सहकार्य केले व मादगी समाजाने पुढाकार व मेहनत घेऊन जयंती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी दिलखुश बोदलकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी रेखाटली.








