सगरोळी ते आदमपूर रोड साईट सोल्डर न भरल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यतामारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी सगरोळी : आदमपूर ते सगरोळी या रस्त्याची खूप अवस्था खराब झाली होती,दैनिक अधिकारनामाच्या बातमीमुळे शासनाचे ठेकेदारास जाग आली, आणि रस्त्याची दुरुस्ती झाली पण,रस्त्यालगट साईट शोल्डर न भरल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे,सगरोळी ते आदमपूर हा रस्ता, अत्यंत महत्त्वाचा असून हा महाराष्ट्र व तेलंगाना या दोन राज्याला जोडला गेलेला आहे,व सगरोळी येथे शिक्षण संस्था मोठी असल्यामुळे, आदमपूर पासून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी सगरोळी ला येत असतात,व देगलूर,बोधन, निजामबाद असा दोन राज्याचा महामार्ग,जोडला गेलेला हा रस्ता,या ठिकाणी तेलंगणातील अनेक व्यक्ती देगलूर येथील बाजारपेठेसाठी, व देगलूर आदमपूर सगरोळी येथील व्यक्ती हे बोधन व निजामबाद कडे,आपल्या व्यवसायासाठी जात असतात.यातच वाळूचे मोठ मोठे ट्रक सगरोळी ते आदमपूर या रस्त्यावरती भर वेगळा धावत आहेत, त्यात साईड शोल्डर नसल्यामुळे गाडी रोडच्या खाली घेण्याची मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांना,आदेश देऊन लवकरात लवकर,साईट शोल्डर भरण्यात यावे,अशी नागरिकांतून विनंती करण्यात येत आहे.ठेकेदारांनी फुटपलीस निष्कृष्ट दर्जाचे काम केले,असून साईड शोल्डर सुद्धा भरलेले नाही, तरी लवकर साईड शोल्डर भरावे. अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.


