सोनल अवचार यांनी प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय लकी सुरवाडे तर तृतीय नेहा तेलगोटे
ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, युवा लोकचळवळ मंच, व द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्था पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन…
अविनाश पोहरे ब्युरो चीफ, अकोला
पातूर : दि : 15 एप्रिल 2025 रोजी डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय पातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त तालुकास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण पातूर चे तहसीलदार मा. राहुल वानखडे, सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे, युवा उद्योजक मा. अमोल घायवट,डॉ.दीपाली घोगरे,जयेंद्र बोरकर,योगेंद्र बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.सदर सामाजिक उपक्रम हा ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, युवा लोकचळवळ मंच, व द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्था पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.तालुकास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सौ. सोनल अक्षय अवचार, द्वितीय लकी रवींद्र सुरवाडे, तृतीय नेहा राजेश तेलगोटे व चतुर्थ राजेश कैलास हिवराळे यांना ट्रॉफी,रोख रक्कम व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि.सतिश हातोले, अविनाश पोहरे, किशोर सुरवाडे, कु. मृणाल इंगळे, कु. तन्वी गवई, सुरेंद्र अवचार, आदित्य हातोले, जीतकुमार इंगळे,कु. कृतिका इंगळे, मोनाली इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले.सदर तालुकास्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये बहूसंख्येने उपस्तित राहून विदयार्थ्यांनी भरभरून उत्सपूर्त प्रतिसाद दिला तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.


