शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
प्रशासनाने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी उद्या धरणे, मोर्चासह ‘गावबंद’श्रीगोंदा : संत शेख महंमद महाराज मंदिराचे मानकरी व गावकरी यांना अंधारात ठेवून मूळ ट्रस्ट मोडीत काढत नव्याने केलेले सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टची केलेली नोंदणी रद्द करून जीर्णोद्वार कामातील अडथळा तातडीने दूर करून हे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, यासाठी गुरुवारी (दि. १७) श्रीगोंदा शहरवासीय व तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य मोर्चा व बेमुदत गाठबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात माटले आहे की, सद्गुरू श्री संत शेख महंमद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला. श्री संत शेख महंमद महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे समकालीन वारकरी संत असून, त्यांचे धार्मिक अध्यात्माच्या बाबतीतले एकत्रपणाचे अनेक पखले उपलब्ध आहेत. त्यांनी जीवनभर वारकरी संप्रदायाचे काम केले व समाजाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी काम केले. ते योग अभ्यासक असल्याने योगी परंपरेप्रमाणे महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा शहराचे व तालुक्याचे ग्रामदैवत आहे. मात्र शहरातीलकाही लोक महमद महाराजांचे वंशज असरल्याचे सांगतात, मात्र त्याचायत न्यायालयाने विचारल्यानंतर एकही पुरावा त्यांना सादर करता आलेला नाही. असे असतानादेखील स्वतःला वंशज म्हणवून घेत महाराजांच्या संजीवन समाधीनंतर रूढीपरंपरेने सर्व कार्य करणान्या मानकरी व गावकन्यांना अंधारात ठेवत पूर्वीचे शेख महंमद कुवा देवस्थान या नावाने असलेला ट्रस्ट मोडीत काढत सुफी संत शेख महंमद बाबा दोह ट्रस्ट नावाने ट्रस्टची स्थापना करून वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपराना छेद देत भाविक भक्तांच्या भावनांना येजोवेळी तेच पोहोचेल अशा पद्धतीचे कार्य करतात, संत शेख महंमद महाराजांच्या मंदिराचा जिणोद्धारझाला पाहिजे अशा प्रकारची भावना सर्व स्तरांत आहे. मात्र या जीर्णोद्वारच्या कामांमध्ये शेख हे अडथळा निमांग कर आहेत. सन २००८ साली गावकऱ्यांनी जीणोंडार करण्याच्या बाबतीतल्या भूमिका घेतल्या असताना काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या जिलाधिका-यांचे प्रतिनिधी म्हणून त्वावेजचे प्रांत अधिकारी कुंदन सोनवणे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधीम्हणून डी. वाय. एम.पी यांनी समन्वय साधत यात्रा उत्सव समितीचे प्रमुख सर्व मानकरी, सर्वपक्षीय नेते व मुस्लिम धर्मीय सर्व नेते यांची एक बैठक घेतली.बैठकीत जीषोंझराच्या चाचतीतलया अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महाराजांच्या मंदिरात राहणारे व इतरांनी आम्हाला मंदिरापासून जवल घरे बांधून द्या, अशी मागणी केली होती. ती मागणी गावकऱ्यांनामान्य केली. तडजोड झाली. मात्र, ती तहजोड पुढे त्यांनी मोडीत काढल्याने जीर्णोद्वारचे काम सुरू होऊ शकले नाही. कालांतराने बाहेर गेलेल्या लोकांनादेखील त्यांनी पुन्हा मंदिरात ग्रहन्यासाठी आपले व जियोंद्वाराच्या कामाला अडथळा निर्माण केला आहे. यासाठी गुरुवारी (दि.१७) श्रीगोंदा शहरवासीय व तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने मोधांचे आयोजन करण्यात आले आहे.


