सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण मेहकर यांच्या मार्गदर्शन खाली वनरक्षक जि.एम.पोटे यांनी सांगितल्याप्रमाणे कासारखेड कळबेंश्वर रोडच्या दुतर्फा 500+500=1000 झाडाची 2कि.मी अंतरावर लागवड झाली आहे.सदर लागवडीसाठी जुन महिन्यांमध्ये गड्डे खोदुन दोन रोपांतील अंतर 4×4मिटर अंतरावर लागवड करण्यात आली आहे.
जांभूळ, फापडा,गुलमोहर, लिंब,पिंपळ, कांचन, आवळा,सिताफळ, बांबू, करंज, इत्यादी वृक्ष लागवड केली आहे रोड दुतर्फा या झाडांचे गुरे,ढोर,बकऱ्या,
मोकाट जनावरे पासून संरक्षण म्हणून
त्या रोपांना मातीची भर देणे, खत देणे ,निंदणी करून बाभूळ, बोरीच्या काट्या पार व्दारे दर पाडुन काट्या लावत असतानी 15 मंजूर आज मोक्यावर दिसून आले व त्या ठिकाणी मजूरांकडुन काम करून घेण्याचे काम वनरक्षक जि.एम.पोटे हे करत होते.











