सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर सध्या राज्यभर रक्ताचा तुटवडा असून रक्तसाठ्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याने सामाजिक भावनेतून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ( WMO) व सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर एकाच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून मेहकर येथे स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करन्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सर्वश्रेष्ठ असलेल्या रक्तदान मोहिमेत सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.