अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग बारावीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून, यामध्ये पातूर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिकदृष्टय़ा अग्रेसर असलेल्या डॅा एच एन सिन्हा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००% लागला आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तीक लक्ष दिल्या गेले.सोशल माध्यमाचा वापर करुन त्यांच्या विषयानुसार अडचणी सोडविल्या गेल्या यावर्षी कोविड-१९ प्रादुर्भाव असूनसुद्धा महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाइन /ऑफलाईन पध्दतीने अभ्यासक्रम पूर्ण केला असून मंडळाने नियोजित केलेल्या परीक्षेची सर्व विद्यार्थ्यांची पूर्वतयारी जोमाने केली होती. परंतु कोरोना-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता शिक्षण मंडळाने नियोजित परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली व अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्याचा आदेश मंडळाने जाहीर केला व अंतर्गत मूल्यमापन पध्दतीनुसार निकाल नुकताच मंडळाने जाहीर केला असून महाविद्यालयातील कला शाखेत १५ विद्यार्थी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
वाणिज्य विभागाचे ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. एम सी व्ही सी विभागाचे १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारीणी सदस्य केशव मेतकर तसेचं सर्व सन्माननीय कार्यकारीणी सदस्य व महाविद्यालय विकास समीती सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा के एस खंडारे आणि प्रा. सुरेश लुंगे, प्रा. गजानन जवंजाळ, प्रा. विवेक डवरे, प्रा. नलीनी खोडे, प्रा.उज्वला मनवर,प्रा. कुणाल विंचूरकर, प्रा. शिवकुमार बायस ,प्रा. स्वाती राखोंड़े , प्रा. मु्कुंद कवडकर , प्रा.रवि तायडे यांना दिले.











