गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक नागरीक व शेतकरी विस्थापीत झालेले असुन त्यांचे सरकार तर्फे तातडीने मदत व पुर्नवसन करण्यात यावे
जुलै २०२१ मध्ये यावर्षी दोन दिवसामध्ये साधारण १६०० मि.मि. इतका पाऊस पडला म्हणजे वर्षभरात पडणाऱ्या पावसासाच्या किमान ९०% पाऊस पडला म्हणजे वर्षभरात पुरामुळे होणारे नुकसान फक्त मागील एका आठवड्यात संपुर्ण महाराष्ट्रभर झाले त्यामुळे दरड कोसळणे शेत जमीन खरडुन जाणे उभी पिके वाहुन जाने असे विदारक चिञ निर्माण महाराष्ट्रात झाले होते शेतकऱ्यांच्या शेतात फक्त दगड गोटे शिल्लक राहीलेले आहेत पशुधन सुध्दा मृतपाय झाले आहे आता सदरची शेती नव्याने करण्या योग्य जमीन बनविण्यसाठी शेतात बाहेरुन माती विकत आनुन शेतकऱ्यांना शेती करावी लागेल अशी परिस्थितीत आहे भुमीहीन मागासवर्गीय ,अल्पभुधारक यात सर्वाधीक भरडल्या गेले आहेत लहान बालक आणी महीलांची मोजदाद देखील नाही कापुस सोयाबीन डाळ व फळे.आणी भाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसीनी बाबत सरकारने पिकांची जाहीर केलेली एफ.आर,पी.आणी एम एस.पि. घाऊक तसेच किरकोळ बाजारात असलेली धान्याची आणी पिकांची किंमत मुल्यधारीत करुन सबंधीत शेतकऱ्याला पिकाची आणी उत्पादनाची किंमंत मदत म्हणुन जाहीर करावी महापुरात झालेल्या नुकसानी बाबत सरकार सरकारी निकषानुसार केली जाणारी मदत तुटपुंजी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन होणाऱ्या पिकाचे बाजार मुल्य म्हणून शेतकऱ्याला मीळावे दुबार पेरणी करणे शेतकऱ्यांना आर्थीक दृष्ट्या परवडनार नाही त्यामुळे,शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे झालेल्या नुकसान भरपाईची मदत करावी अश्या आशयचे निवेदन वंचीत बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याचे वतीने तहसिलदार डाॕ.संतोष येवलीकर यांणा देण्यात आले यावेळी तालुका महासचिव अशोक दारोकार सौ. पदमाबाई गवारगुरु महीला आघाडी अध्यक्ष
विकास पवार शहर अध्यक्ष सैफुल्ला खाॕ पठाण ,जिवन बोदडे, सिध्दार्थ शामस्कार जिल्हा संघटक भारतीय बौध्द महासभा पंजाबराव दुसेकर सौ.संगीताताई अढाऊ मा. जि.प सदस्या , अनिल मोहोड अरविंद तिव्हाणे मो.इद्रीस प.स.सदस्य, पञकार आनंद बोदडे, नितीन पाखरे संघर्ष वानखडे सरपंच, भाऊदेव भटकर, लखन सोनटक्के, मनोज पोहरकार, आशीष जसनपुरे, अजय पोहरकार नितीन पोहरकार, प्रमोद चव्हाण सतिष मामनकार, भुषन जवंजाळ , संघपाल खिराडे नागसेन तायडे, रतन दांडगे सुनिल भोजने, सौ.सुज्ञान खंडेराव सौ.स्वाती भोजने सौ.शिल्पा भोजने, सौ.विद्या पोहरकार सौ.कल्पना हिवराळे दिपमाला गवई रंजना वानखडे,झिया शहा, शफीक खान, शे अन्सार, पंजाबराव तायडे, प्रकाश बोदडे, प्रदिप सावळे, महेबुब खा, सुभाष भड.पञकार सिध्दार्थ गवारगुरु यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते