काँग्रेस व भाजपा मध्ये रसाखेच.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील सरपंच सेवा संघटनेची अध्यक्ष पदाची निवळी बाबत आज टीचर सोसायटी सभागृहात चंद्रपूर जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष हेमराज लांजेवार यांनी सभा आयोजित केली होती. व त्यासभेमध्ये सरपंच यांच्या वाद निर्माण झाला व नागभीड तालुक्यातील 56 सरपंच्यापैकी 36 सरपंच एका बाजूला व 30 सरपंच एका बाजूला झाल्याने काँग्रेस व भाजपा असा चुरस सामना आज सरपंच महासंघात पाहायला मिळाला एकीकडे कमलाकर ठवरे बाळापूर (खुर्द) येथील सरपंच यांच्या कडे काँग्रेस समर्पित 36 सरपंच्यांचा पाठींबा मिळवून सरपंच सेवा महासंघ नागभीड चे तालुका अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले तर दुसरी कडे नीरज शिद्धामशेट्टीवार पळासगाव (खुर्द) येथील सरपंच यांना भाजपा समर्पित 30 सरपंच्यांचा पाठींबा मिळवून सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे नागभीड तालुक्यतील ही आगळी वेगळी संघटना दिसून येत असल्याने सरपंचसेवा महासंघाचा नेमका अध्यक्ष कोण हा प्रश्न लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतांना दिसत आहे. महाराष्ट्र सरपंचसेवा महासंघात नागभीड तालुक्यातील पहिली संघटना आहे की त्यामध्ये एकाच तालुक्यात दोन सरपंचसेवा महासंघ दिसून येत आहे. त्यामुळे आता नागभीड तालुक्यातील जनतेचा लक्ष सरपंच संघटनेचा अध्यक्ष कोण? भाजपा चा की काँग्रेस चा त्यामुळे आता या एकाच चर्चेला उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.