पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: घरासमोरिल अंगणात उभी केलेली दुचाकी अज्ञातांनी जळल्याची घटना तालुक्यातील आंबा येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुभम थेटे(रा.रेल ता.कन्नड)हे दिनांक 1 ऑगस्ट रोजी पत्नीसह आंबा येथे सासुरवाडीला दुचाकी घेऊन गेले होते.रात्री जेवण आटोपून झोपुन गेले.मात्र रात्री दिड वाजेच्या सुमारास काहीतरी फुटल्याचे आवाज आल्याने अंगणात येऊन बघितले असता त्याची बजाज पल्सर दुचाकी (एमएच 20 एफबी 5759) अज्ञातांनी जाळलेली दिसली.याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा तपास संजय आटोळे हे करीत आहे.











