रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : ता.२१ : मागील खरीप हंगामामध्ये १ व २ सप्टेंबर २०२४ ला अतिवृष्टीने जिल्ह्यासह तालुक्यात हाहाकार माजविला होता.अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन उध्दवोस्त झाल्या होत्या.त्या भयानक दृश्य अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले होते.या अतिवृष्टीत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे.संकट काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मानसिक धीर देण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झाले.मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून चांगली मदत मिळावी या करीता सततच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली होती.जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पिक नुकसान व शेतमालाचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा त्यांना पीक विमा जोखीम आर्थिक परतावा दिवाळीपूर्वी देण्यात यावा या मागणीसह शासनाकडे निवेदन दिले रस्त्यावरची आंदोलने करून तातडीने अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी ही मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.जिल्हयात आगष्ट २०२४ मध्ये अतिवृष्टी आणि पुर परस्तीथीमुळे तब्बल १ लाख ७६ हजार २०२.९१ हेक्टर वरील खरीप पिके बाधीत झाली होती.तबल पाच महिन्यांनंतर शासनाने १ लाख ९० हजार २८५ शेतकऱ्यांसाठी २५१ कोटी १८ लाख ५२ हजाराचा निधी मंजूर केला आहे. ” ओला दुष्काळ व अतिवृष्टी सततची नापीकी कर्जबाजारीपणाने जिल्ह्यात ३४९ शेतकऱ्यांचे बळी गेले नुकसानीच्या तुलनेत प्राप्त झालेल्या २५१ कोटीचा निधी अत्यल्प असुन शेतकऱ्यांच्या पदरात कीती पडते हे आता मदत मिळाल्या नंतर कळेल या मदतीला खुप उशीर झाला आहे. ….मनिष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना


