कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…!
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग बारावीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून, यामध्ये पातूर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिकदृष्टय़ा अग्रेसर असलेल्या वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.या महाविद्यालयाचे यशाचे गमक म्हणजे महाविद्यालयात सर्वच विषयांची शिकवणी ही नियमित होते व अतिरिक्त शिकवणी वर्ग घेतले जातात. यावर्षी कोविड-१९ प्रादुर्भाव असूनसुद्धा महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाइन /ऑफलाइन पध्दतिने अभ्यासक्रम पूर्ण केला असून मंडळाने नियोजित केलेल्या परीक्षेची सर्व विद्यार्थ्यांची पूर्वतयारी जोमाने केली हाेती, परंतु कोरोना-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता शिक्षण मंडळाने नियोजित परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली व अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्याचा आदेश मंडळाने जाहीर केला व अंतर्गत मूल्यमापन पध्दतीनुसार निकाल नुकताच मंडळाने जाहीर केला असून महाविद्यालयातून प्रतीक धवणे याने ८८.८३ % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला, तर कु. विशाखा खुळे ८८.०० % तसेच कु. तृष्णा गाडगे ८८.०० % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच प्रदीप वानखेडे याने ८७.१६ % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवला , कु. गौरी इंगळे ८६.६६%, कु. गायत्री शेवलकार ८५.३३%, कु. निकिता तायडे ८५.१८%, तुषार सिरसाट ८४.८३ % , कु. कल्याणी गोळे ८४.५० %, कु.आदिती वानखेडे ८४.५० %, दीपक राखोंडे ८३.८३ % ,कु. तन्वी गाडगे ८३.५० % कु.गायत्री ठाकरे ८३.००%, कु.पायल राठोड ८२.८३ %. गुण प्राप्त केले.महाविद्यालयातून एकूण ७६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले हाेते,यामधून महाविद्यालयातून एकूण ४९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर एकूण २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एम. सौंदळे व सर्व मार्गदर्शन करणा-या प्राध्यापकांना दिले.











