आमदार बंटीभाऊ भांगडीयाना दिले निवेदन.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या नवतळा येथील बेलदेव देवस्थानला जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. असे निवेदन महादेव कोकोडे माजी सरपंच तथा तालुका उपाध्यक्ष भाजपा यांनी गावकऱ्यां तर्फे या चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया याना काल दि 2 जुलै निवेदन दिले.
सदर नवतळा या गावापासून पूर्वेस 3 किमी दुरीवर जंगल भागात नयनरम्य निसर्गाच्या कुशीत तलावाजवळ प्रसिद्ध असे बेलदेव देवस्थान आहे. तिथे हजारो भाविक नेहमीच दर्शनाला जात असतात. तसेच प्रसिद्ध अशी बेलदेवाची यात्रा व काल्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. परंतु या धार्मिक स्थळी जाण्यासाठी रस्ता हा पक्का नसून मुरूम मातीचा कच्चा रस्ता आहे. इथे जाण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात तर पावसाळ्यात खूप मोट्या संकटाचा सामना करीत जावे लागते कुठे गड्डे तर कुठे चिखलयुक्त रस्ता तर कुठे पाणीच पाणी अश्या अनेक समस्या चा सामना करीत वाट काढीत देवस्थानाच्या दर्शनाला जावे लागते.
तसेच या मार्गावर नवतळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या असल्यामुळे त्यांना सुद्धा नेहमीच नाहक त्रास सहन करावा लागतो पावसाळ्यात तर या रस्त्याची दयनीय अवस्था असते कुठुन जावे कसे जावे काही कळत नाही. या रस्त्यासाठी अनेकदा शासनाकडे अर्ज व निवेदने देऊनही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या गावचे तरुण नेतुत्व महादेव कोकोडे यांनी गावाच्या वतीने ही बाब या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ याना लक्षात आणून देऊन पक्का रस्ता बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावे. यासाठी निवेदन दिले या प्रसंगी अनेक कार्यकर्ते भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.