पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.2 : तालुक्यातील अंधानेर येथे मृत झालेल्या महिलेस स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यासाठी नेले असता पाणी पाण्याची क्रिया सुरु असताना मृत घोषित केलेल्या महिलेने डोळे उघडल्याने जीवंत पणी सरणावर मरण बघितल्याची घटना घटना घडली आहे. दी. २ रोजी आंधानेर येथील जीजाबाई गोरे या ७५ वर्षीय वुध्द महिलेस पाच वाजेच्या सुमारास गावातील एका खाजगी डॉक्टर ने मृत घोषित केले. यामुळे सर्व जवळच्या नातेवाईक यांना निधन वार्ता देण्यात आली. गावापासून स्मशानभूमिचे अंतर अर्धा किलोमीटर आसल्याने कन्नड शहरातुन स्वर्गरथ मागविण्यात आला. अंत्यसंस्कार करण्या अगोदर च्या सर्व क्रिया करण्यात येवून वाजतगाजत रात्री नऊ वाजता स्मशानभूमित अंत्य यात्रा पोहचली. मयत महिलेस लाकड़ाच्या सरणावर ठेवण्यात येवून चारी बाजूने रॉकेल चा शिड्काव करण्यात आला. शेवटी पाणी पाजन्याची क्रिया सुरु असताना महिलेच्या डोळयाच्या पापणी वर पाणी पडले व महिले डोळयाची उघडझाप केली. हा प्रकार तेथे आंधार आसल्याने उजेड करिता हातात बॅटरी धरलेल्या इसमाच्या नजरेस आल्याने त्याने तात्काळ पुढील कार्यक्रम थांबवला लगेच आंगवर रचलेली लाकड़ काढण्यात आली. यामुळे महिलेची हालचाल वाढली अनं चक्क महिला उठून बसली यामुळे एकच सुरु असलेली नातेवाईकांची रड़ारड थांबली व एकच खळबळ उडाली. लगेच महिलेस सरणा वरुन खाली घेण्यात येवून तात्काळ शहरातील डॉ मनोज राठोड यांच्या दवाखान्यात उपचार करिता आणले यावेळी त्या जीवंत असून ऋदय सुरु आहे मात्र ब्रेन डेड असून त्या कोमात गेल्याचे डॉक्टरनी सांगून घरी घेवून जाण्यास सांगितले. सदर महिला गेल्या अनेक दिवसा पासून आजारी आसल्याने घरात पडून आसल्याने व अन्नपाणी घेत नसल्याने अशक्त झाली होती. मात्र पाच वाजता घडलेली घटना नऊ तास उलटुन झाले तरी महिलेने हालचाल केली नाही मात्र अग्निडाव देण्याचे वेळेस केलेली हालचाल मुळे नातेवाईक यास दैवी चमत्कार समझत आहे. सदर महिला ही माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या मातोश्री असून त्याना चार मुले एक मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे. सध्या वृद्ध महिलेवर गावात उपचार सुरु असून रात्री उशिरा पर्यत सर्वत्र या घटनेची चर्चा सुरु होती. पाच वाजता सोशल मीडिया निधन बाबत पोस्ट अनेक ग्रूपवर टाकन्यात आली मात्र नऊ वाजता महिला जीवंत आसल्याने पुन्हा पुनर्जीवन मिळाल्याची पोस्ट टाकण्यात आली.